Zee Marathi Serial list 2023 with Time | झी मराठी मालिका लिस्ट 2023 | New Serial in Zee Marathi 2023 | Zee marathi serial download | Latest Zee Marathi Serial list | list of zee marathi serials
झी मराठी हे भारतातील एक लोकप्रिय मराठी-भाषेतील दूरदर्शन चॅनल आहे ज्याची मालकी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आहे. हे चॅनल 1999 मध्ये लाँच करण्यात आले आहे.झी मराठी वर नाटक, विनोद, रिऍलीटी शो आणि बरेच काही यासह विविध कार्यक्रमांसाठी ओळखले जाते.ह्या चॅनेलच्या काही लोकप्रिय मालिका जग प्रसिद्ध आहेत.
अलीकडेच कौटुंबिक नाटकाच्या वास्तविकतेवर आधारित कार्यक्रमांपासून ने अलौकिक कार्यक्रमांपर्यंत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या मालिका सुरू केल्या आहेत. या ब्लॉगमध्ये, आम्ही तुम्हाला या प्रादेशिक वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची तपशीलवार माहिती देण्यासाठी झी मराठी मालिकांची यादी तयार केली आहे.
Also read >> Colors Marathi Serials List
Also read >> Star Pravah Serial List
Latest Zee Marathi Serials List 2023 With Time
Serial Name | Serial Timing | Show Days |
Home Minister | 6:00 pm – 6:30 pm | Mon-Sat |
Mazhi Tuzhi Reshimgaath | 6:30 pm – 7:00 pm | Mon-Sat |
Aappi Amchi Collector | 7:00 pm – 7:30 pm | Mon-Sat |
Tu Chaal Pudh | 7:30 pm – 8:00 pm | Mon-Sat |
Hridayi Preet Jaagate | 8:00 pm – 8:30 pm | Mon-Sat |
Daar Ughad Baye | 8:30 pm – 9:00 pm | Mon-Sat |
Nava Gadi Nava Rajya | 9:00 pm – 9:30 pm | Mon-Sat |
Chala Hawa Yeu Dya | 9:30 pm – 10:30 pm | Mon-Sat |
Saatvya Mulichi Saatvi Mulgi | 10:30 pm – 11:00 pm | Mon-Sat |
Tu Tevha Tashi | 11:00 pm – 11:30 pm | Mon-Sat |
Latest Serial List Zee Marathi 2023
1. Home Minister | होमी मिनिस्टर
Host : आदेश बांदेकर
होम मिनिस्टर हा भारतीय मराठी रिऍलीटी गेम शो आहे जो झी मराठीवर प्रसारित केला जातो. हे 13 सप्टेंबर 2004 रोजी सुरू झाले. मराठी टीव्ही शोमध्ये ही झी मराठीची तिसरी सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. आदेश बांदेकर यांनी होस्ट केला आहे.
होम मिनिस्टर ह्या रिऍलीटी गेम शो मध्ये आदेश बांदेकर हे जोडप्याला घरी जाऊन त्यांचा कुटूंबाला भेटतात, गप्पा मारतात आणि प्रश्न उत्तराचे गेम खेळतात. बरोबर उत्तरास गिफ्ट देतात. हा आसा पूर्ण रिऍलीटी गेम शो आहे.
2. Mazhi Tuzhi Reshimgaath | माझी तुझी रेशीमगाठ
Star Cast : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, मोहोन जोशी, मायरा वैकुल.
माझी तुझी रेशीमगाठ या सिरीयल मध्ये यश एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित बिझनेसमन आहे. खऱ्या प्रेमाची तळमळ करतो. तो नेहाच्या प्रेमात पडला असताना, पुढचा प्रवास त्याच्यासाठी सोपा असणार नाही. तो नेहाचे मन जिंकू शकेल का?
नेहा एकटी तिच्या मुली बरोबर म्हणजे परी सोबत राहते असते. परी खूप गोंडस आणि लाडकी आहे पण मधुमेहाने ग्रस्त आहे आणि इन्सुलिन वर आहे. नेहाच्या पतीने परीच्या जन्मापूर्वीच त्यांना सोडून दिले होते तेव्हापासून ती एकट्याने तिची काळजी घेते, काम करणारी आई असल्याने परीची काळजी शेजारचे एक ज्येष्ठ नागरिक जोडपे घेते.
यश हा दुबईस्थित उद्योगपती त्याच्या कामानिमित्त मुंबईत येतो आणि नेहाला भेटतो आणि पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडतो आणि नेहा त्याच्याच कंपनीत काम करत असल्याचे त्याला समजते. यश उघड न करण्याचा निर्णय घेतो. यश त्याचा मित्र समीरला सर्वांसमोर बॉस म्हणून ओळख सांगतो आणि तो त्याचा सहाय्यक असल्याचे भासवतो. यश नेहाच्या जीवनातील संघर्षाबद्दल जाणून घेतो आणि प्रत्येक वेळी तिच्या मदतीला धावून येतो आणि परीशी मैत्री करतो. पुढचा प्रवास त्याच्यासाठी सोपा असणार नाही. तो नेहाचे मन जिंकू शकेल का?
3. Aappi Amchi Collector | अप्पी आमची कलेक्टर
Star Cast : शिवानी नाईक, रोहित परशुराम
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत महिला सक्षमीकरण अधोरेखित केले. यात अपर्णा या मुलीची कथा आहे, जिची पार्श्वभूमी असूनही, आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. ती तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करते, ज्यांना तिच्या मुलीने सन्मानपूर्वक जीवन जगायचे आहे.
झी मराठी चॅनेलवर नवीन मालिका प्रसारित झाली आहे त्या मालिकेचं नाव आहे,”अप्पी आमची कलेक्टर”. मूळ कथा ही एका गरीब मुलीच्या जीवनावर आधारीत आहे. या मालिकेच्या मुख्य भूमिकेमध्ये शिवानी नाईक आणि रोहित परशुराम दिसणार आहेत. शिवानी नाईक ही अप्पीच्या भूमिकेत दिसणार आहे.
अप्पी आमची कलेक्टर ही मालिका 22 ऑगस्ट 2022 पासून सोमवार ते शनिवार रात्री 7 वाजता झी मराठी वाहिनेवर सुरु झाली आहे. या मालिकेचे निर्माते संजय खंबे आणि श्वेता शिंदे असून याचे शुटींग महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील आहे. अप्पी एका खेडेगावात राहणारी, अतिशय हुशार, अत्यंत कष्टाळू आणि समजूतदार मुलगी आहे. तिला कलेक्टर बनायचं असतं. त्यासाठी खूप मन लावून अभ्यास करत असते. ति राहते त्या गावात शैक्षणिक सुविधा नसतात. तिला आयुष्यात खूप मोठं व्हायचं असतं स्वतःच आपल्या आई-वडिलांच, तिच्या गावाचं नावलौकिक व्हावा म्हणून सतत कार्यरत असते. तिची स्वप्ने खुप मोठी असतात. ती पूर्ण करण्यासाठी तिला येणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणींना ती कशी सामोरे जाते ते पहायला मिळणार आहे.
एका खेडे गावात राहणारी मुलगी सर्व अडचणींचा सामना करून आपले स्वप्न पूर्ण करेल की नाही…? बघायला विसरू नका.
4. Tu Chaal Pudh | तू चाल पुढं
Star Cast : दीपा परब, आदित्य वैद्य, धनश्री काडगावकर
झी मराठी चॅनेलवर नविन मालिका प्रसारित झाली आहे. व्या मालिकेच नाव आहे, “तू चाल पुढं”. मालिकेची कथा संसाराशी निगडीत आहे. या मालिकेमधे मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे दिपा परब ही अंकुश चौधरी ची पत्नी अश्विनी च्या भूमिकेत दिसणार आहेत. आदित्य वैदय हा श्रेयस च्याची भूमिका साकारणार आहेत.
तू चाल पुढं या मालिकेचे लेखन श्वेता पेंडसे यांनी केले असून निर्मात राजू सावंत आहेत. 15 ऑगस्ट 2022 पासून सोमवार ते शनिवार रात्री 7:30 वाजता सुरु आहे. एका सर्वसामान्य स्त्रीच आयुष्य खूप कठीण असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केलेले काम, घरातील सदस्यांची घेतलेली काळजी पहायला मिळणार आहे. तर अश्विनी एक साधी सरळ गृहिणी आहे. जिची स्वप्ने खूप मोठी आहेत. लग्नानंतर संसाराच्या वेढ्यात अडकल्याने नी स्वतःची स्वप्ने दुर्लक्ष करते. मनापासून संसारात रुची निर्माण करते. एक सून म्हणून, एक बायको म्हणून एक आई म्हणून तिची सगळी कर्तव्य चोख पार पाडते. सर्वसामान्य गृहिणी स्वतः चा संसार नीट व्हावा म्हणून काटकसर करत संसाराचा गाडा ओढत असते.
आधी घरातील सदस्यांचा विचार करून मग आपला करते. जेव्हा घरातील सदस्य आपल्यालाच सांगतात की “पैसे वाचवायला नाही तर कमवायला अक्कल लागते” तेव्हा एक गृहिणी काय करू शकते ते पहायला मिळेल. स्वत: ला केलेलं चॅलेंज अश्विनी पूर्ण करेल की नाही ते बघायला पाहात रहा- “तु चाल पुढ”.
5. Hridayi Preet Jaagate | हृदयी प्रीत जागते
Star Cast : पूजा कातुर्डे, सिद्धार्थ खिरीड
झी मराठी चॅनेलवर नविन मालिका प्रसारित झाली आहे. त्या मालिकेचे नाव आहे ” ह्रदयी प्रीत जागते”. मालिकेच्या शीर्षकावरून लक्षात आलेच असेल, की ही एक प्रेमकथा आहे. अगदी बरोबर ओळखलं..! ही एक प्रेमकथाच आहे पण दोन तरुणांची नाही तर संगीतमय प्रेमकथा आहे.
हृदयी प्रीत जागते ही मालिका 7 नोव्हेंबर. 2022 पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरु झाली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक मंदाळ मंदार देवस्थळी असून लेखन अभिजीत शेंडे आणि मालिकेची निर्मिती राजेश जोशी यांनी केली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की वीणा आणि प्रभास दोन विरुद्ध स्वभावाचे व्यक्तीमत्व आहेत. वीणा ही एक शास्त्रीय संगीतप्रेमी आहे. – विठ्ठल भक्ती करते. रुढी परंपरांचा वारसा चालवणारी… अभंग भजन किर्तन करणारी मुलगी. देऊळ हे – तिच घर आहे अस सांगणारी. तर दुसरीकडे प्रभास हा रॉक बँड परफॉर्मर आहे. बेफिकर, हटटी, हुशार असा मुलगा. नवनवीन संगीत शिकण्यास नेहमी उत्सुक असलेला. सगळ्यांत जास्त संगीतावर प्रेम करणारा Music त्याची Passion आहे. त्यासाठी तो काहीही करून शकतो. तर मित्रांनो, एकाच नाण्याच्या दोन बाजू असणाऱ्या या दोघांची संगीतमय प्रेमकथा कशी आहे हे बघायला विसरू नका.
6. Daar Ughad Baye | दार उघड बये
Star Cast : सानिया चौधरी , रोशन विचारे, शरद पोंक्षे
झी मराठी चॅनेलवर नवीन मालिका प्रसारित झाली आहे त्या मालिकेचं नाव आहे,”दार उघड बये”. रोशन विचारे या मालिकेचा मुख्य नायक असून सानिया चौधरी मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेची काय आहे कथा जाणून घेऊया….
संबळ वाजवून उदरनिर्वाह करत पारंपारिकता जपणाऱ्या कुटुंबात आई वडील दोन मुली एक मुलगा आहे. वडील निष्णात संबळवादक असून शहरातील एका श्रीमंत घरात प्रत्येक नवरात्रात संबळ वाजवण्याचा मान त्यांच्याकडे आहे. कर्जापायी सावकार घर हिसकावू पाहत असताना वडील काही दिवसांची सवलत घेऊन त्या गर्भश्रीमंत घरी नवरात्रीच्या नऊ दिवस वाजवण्यासाठी जातात. त्यांना दम्याचा आजार असल्याने काळजीपोटी मोठी मुलगी मंजिरी सोबत जाते. त्या घरातील मुख्य व्यक्ती रावसाहेब नगरकर पुरुषप्रधान मानसिकतेचा असून घरातील बायांवर नाच गाणे वाजवणे या सर्वांवर बंधणे आहेत. त्याची सावत्र आई चंद्रा तमासगीर होती व तिच्यामुळेच माझी सख्खी आई गेली म्हणून तिला एका घरात बंदिस्त केलेले असते. घट बसतानाच्या पहिल्या आणि महत्वाच्या आरतीला वाजवताना वडिलांना दम्याचा प्रचंड त्रास झाल्याने आरती मध्येच थांबवावी लागते. अनेक वर्षांची परंपरा मोडल्याने चिडून रावसाहेब त्यांना घराबाहेर काढत असताना मंजिरी स्वतः संबळ घेऊन वाजवायला उभी राहते. पुरुषी अहंकार असलेल्या कुटुंबप्रमुखाला स्त्रीने देवीपुढे संबळ वाजवणे प्रचंड त्रास देवून जाते. ही मालिका 19 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता सुरु झाली आहे.तर पुढे काय काय घडेल ते पहिला विसरू नका..
7. Nava Gadi Nava Rajya | नवा गडी नवं राज्य
Star Cast : पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर
झी मराठी चॅनेल वर नवीन मालिका प्रसारित झाली आहे. त्या मालिकेच नाव आहे. ‘नवा गडी नवं राज्य’. मूळ कथा ही संसारावर आधारीत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अनिता दाते, पल्लवी पाटिल आणि कश्यप परुळेकर दिसणार आहेत. अनिता दाते ही रमाच्या भूमिकेत आणि पल्लवी ही आनंदीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी ही कथा आहे. आनंदी आणि रमाच्या संसारात घडणाऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहे. दोघींची जुगलबंदी पाहण्यात खूप मजा येणार आहे.
रमा ही पहिली पत्नी असून ती आता या जगात नाही. तरीही तिने लावलेल्या प्रेमामुळे, जिव्हाळ्यामुळे रमाला घरात कोणीही विसरलेले नाहीत. तिचा आत्मा अजूनही घरात आहे. आनंदी लग्न करून संसाराच माप ओलांडून रमाचा संसार सावरण्यासाठी आली आहे. घरातली सून म्हणून सगळी कर्तव्य पूर्ण करते पण त्या घरात अजूनही परकी ठरते. सगळं सोप्प नसतं नाती जिंकणं… पण आनंदी ने परिस्थितीला हरवण्याच ठरवलं आणि सगळ्यांना खूप जीव लावला.
आनंदी सगळ्यांच्या मनावर राज्य करेल का…. ? संसारातला प्रत्येक ठाव जिंकेल का? हे बघायला विसंक नका.
8. Chala Hawa Yeu Dya | चला हवा येऊ द्या
झी मराठी चॅनेलवर गेल्या 7 वर्षापासून चर्चेत असलेली “चला हवा येऊ दया” ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेचे निर्माते नितिन केनी आणि आकाश चावला असून त्याचे दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे करतात.
चला हवा येऊ दया च्या मंचावर आगामी चित्रपट, नाटक नविन मालिका, एकांकिका यामधील कलाकारांना बोलवले जाते. त्यांच्या भूमिकेच कौतुक करत साकारलेल्या पात्राचे गमती जमती मधे सादरीकरण केले जाते. ‘थुकरटवाडी” नावाचे एक काल्पनिक गाव आहे. तिथे कधी पोलिस, कधी आमदार, कधी शेतकरी. कधी डॉन असे वेगवेगळे भूमिका साकारणारे व्यक्तिमत्व दर्शविले ‘ जाते.
हा एक रिऍलीटी शो आहे. ज्यामधे मनोरंजना सोबत सामाजिक कार्य आणि जीवनाशी संबंधित गोष्टींचा लोकांना सांगण्याचा उददेश असतो.
9. Saatvya Mulichi Saatvi Mulgi | सातव्या मुलीची सातवी मुलगी
Star Cast : तितिक्षा तावडे, अजिंक्य ननावरे
झी मराठी चॅनेल वर नवीन मालिका प्रसारित झाली आहे. त्या मालिकेच नाव आहे “सातव्या मुलीची सातवी मुलगी”.
मूळ कथा ही बांग्लावरील “त्रिनयनी” या बंगाली मालिकेवर आधारित आहे. मालिकेच्या मुख्य भूमिकेत तितिक्षा तावडे असून या मालिकेमध्ये येणाऱ्या एपिसोड मध्ये खूप भयंकर अश्या घटना बघायला मिळणार आहेत. तीतिक्षा ची भूमिका नेत्रा या नावाने आहे. नेत्रा ही एक सर्व सामान्य मुलगी आहे. त्रिनयनी देवीने दिलेल्या वरदानामुळे नेत्रा ला भविष्य दिसते. ती जे बोलते ते घडत नाही तर ती जे घडणार आहे तेच ती बोलते. पण तरीही तिला सगळे काळ्या जिभेची म्हणतात.
देवीने दिलेल्या या दैवी शक्तीचा उपयोग ती समाज कल्याणासाठी करणार असते. पण लोक तिला नेहमी चुकीचं समजतात. तिला दोष देतात. गावातून, त्यांच्या आयुष्यातून निघून जायला सांगतात. यामदे येणाऱ्या पुढील एपिसोड मध्ये घडणाऱ्या घटना पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतील. नेत्रा वर्तमान कस जगते आणि भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स ला ती कश्या प्रकार सामोरे जाते, हे बघायला मिळणार आहे.
10. Tu Tevha Tashi | तू तेव्हा तशी
Star Cast : स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे , सुहास जोशी
मराठी टेलिव्हिजन वरती बऱ्याच काळानंतर स्वप्नील जोशी महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रेक्षक खूप उत्सुक आहेत “तू तेव्हा तशी” या मालिका दि. 7 नोव्हेंबर 2022 पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनेवर सुरु आहे. या मालिकेचे दिग्दर्शक हे मंदार देवस्थळी आहेत.
स्वप्नील जोशी हा सौरभची भूमिका साकारणार आहे आणि शिल्पा अनामिका नावाची भूमिका साकारणार आहेत. सौरभ हा खूप शांत आणि लाजाळू आहे तर अनामिका बोलकी आणि बिनधास्त राहणारी मुलगी आहे. मित्रांनो, प्रेम हा शब्द कानावर आला ना तरी त्या एका व्यक्तिची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
ती व्यक्ति म्हणजे? बरोबर आपलं पहिलं प्रेम.. कोणाला शाळेत झालं असेल, कोणाला कॉलेज मधे गेल्यावर कोणाला बस मध्ये तर कोणाला ट्रेन मधे…. इत्यादी. पण पहिलं प्रेम खूप स्पेशल असतं जे अव्यक्त असतं. बऱ्याच लोकांनी अजूनही सांगितलं नसेल. प्रेम करायचं राहून गेलं असेल. अस म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणा-यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी ही मालिका असणार आहे. वयाच्या चाळीशीनंतर अपूर्ण राहिलेली, अव्यक्त प्रेमकथा पूर्ण होईल की नाही याकडे सर्वांच अक्ष वेधून घेतले आहे. तर पहायला विसरू नका “तू तेव्हा तशी”.
Also read >> Colors Marathi Serials List
Also read >> Star Pravah Serial List
झी मराठी कोणत्या ॲप वर उपलब्ध आहे ?
तुम्ही झी मराठी Zee5 , Vi tvs & movies & Airtel Xtream वर पाहू शकता.
Which serial is going on Zee Marathi?
see in above list or Click here
Where to watch zee marathi serials online free?
Vi tvs & movies & Airtel Xtream.